ज्येष्ठ पत्रकार, चित्रपट-समीक्षक, लेखिका नीला उपाध्ये (79) यांचे नुकतेच चेंबूर येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. चेंबूरच्या चरई विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठी पत्रकारितेतील पहिल्या पूर्णवेळ महिला वार्ताहर असलेल्या नीला उपाध्ये यांनी 1970 पासून 36 वर्षे वार्तांकन केले. विविध दैनिके आणि नियतकालिकांमधून विपुल वैचारिक, ललित तसेच राजकीय स्तंभलेखन करत होत्या. ‘चित्रपश्चिमा’कार म्हणून त्यांनी विशेष ओळख निर्माण केली होती. शोधपत्रकारिता आणि इतर वार्तांकन, लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांनी ‘सत्यजित ः रुपेरी पडद्याचा कवी’, ‘शब्दव्रती शांताबाई’, ‘संशोधक य. दि. फडके’, ‘युगप्रवर्तक बाळशास्त्राr जांभेकर, ‘ती आणि त्य, ‘मी वसंततिलका’, ‘हॅरी पॉटरची आई’ अर्थात जे. के. रोलिंगचे चरित्र, ‘पत्रकार दि. वि. गोखलेः व्यक्तित्व व कर्तृत्व’, राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित अण्णा भाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रांचे संपादन केले होते.