ICC Women’s T20 Ranking – हरमनप्रीत कौरला चार अंकांचा फायदा, या खेळाडूंची घसरण

UAE मध्ये सध्या Women’s T20 World cup ची धामधुम सुरू आहे. सर्व संघ विश्वचषक उंचावण्यासाठी कडवी झुंज देत आहेत. षटकार चौकारांची आतषबाजी चाहत्यांना पहायला मिळत आहेत. या दरम्यान ICC ने टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला या क्रमवारीत चांगला फायदा झाला आहे. मात्र स्मृती मानधना आणि दीप्ती शर्माच्या क्रमवारीत घसरण झाली आहे.

टीम इंडियाच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात न्युझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. मात्र दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने विजय साजरा केला. टीम इंडियाचा तिसरा सामना उद्या श्रीलंकाविरुद्ध होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी आयसीसीने टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीनुसार टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला चार अंकांचा फायदा झाला असून तिने 12 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर स्मृती मानधनाची एका क्रमांकाने घसरण झाली असून ती आता 5 व्या क्रमांकावर पोहचली आहे.

क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी! बुधवार ठरणार चौकार आणि षटकारांचा वार, दोन वेगवेगळ्या ठिकाणी Team India भिडणार

महिलांच्या गोलंदाजी क्रमवारीत टीम इंडियाची फिरकीपटू दीप्ती शर्माच्या क्रमवारीत दोन अंकाची घसरण झाली आहे. दीप्ती आता दुसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकवर आली आहे. तर वेगवान गोलंदाज रेणूका सिंग ठाकुर पाचव्या क्रमांकावर कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये टीम इंडियाची दीप्ती शर्मा एकमेव खेळाडू आहे. तसेच पाकिस्तानची फिरकीपटू सादिया इक्बालने चमकदार कामगिरी करत गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान होत इतिहास रचला आहे.