Harayana Result : हरयाणात EVM मध्ये मोठा घोळ? काँग्रेसचा गंभीर आरोप

हरयाणात सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत होते. मात्र नंतर अचानक चित्र बदललं व भाजपला हरयाणात स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपने हरयाणार 48 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला 37 जागा मिळाल्या. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा हरयाणात भाजप सत्ता स्थापन करणार आहे.

दरम्यान काँग्रेसने ईव्हीएम मशीनमध्ये मोठा घोळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. हरयाणातील निकालानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत हा आरोप केला. हरयाणातील हिसार, महेंद्रगढ़ आणि पाणीपत या जिल्ह्यातील अनेक ईव्हीएम मशीन या 99 टक्के चार्ज होत्या, साधारणत: या मशीन जेव्हा उघडल्या जातात तेव्हा त्यांची बॅटरी साठ ते सत्तर टक्क्यांवर असते. ज्या ईव्हीएमची बॅटरी 99 टक्के होती त्या ठिकाणी काँग्रेस हरली आहे तर ज्या ठिकाणी ईव्हीएमची बॅटरी 60 ते 70 टक्के होती तिथे आम्ही जिंकलोय. आम्ही या सर्व तक्रारी निवडणूक आयोगाकडे घेऊन जाणार आहोत. आजचा विजय हा तंत्रज्ञानाचा विजय आहे लोकशाहीची ही हार आहे. आम्ही हे स्वीकारू नाही शकत, असे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी सांगितले आहे.