विरुद्ध दिशेने आलेल्या मद्यधुंद कार चालकाने पाचवीत शिकणाऱ्या मुलीला चिरडल्याची संतापजनक घटना सोमवारी सायंकाळी साताऱ्यात घडली. कोरेगाव तालुक्यातील कोलवडी येथे हा अपघात झाला. जान्हवी जगदाळे असे मयत मुलीचे नाव आहे. मुलीला चिरडल्यानंतर कारने दुचाकींनाही धडक दिली. यात दोघे जखमी झाले. घटनेनंतर आरोपी फरार झाला.
याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, ड्रंक अँड ड्राईव्हचे प्रकरण असूनही पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सुरवातीला आरोपीला अटक केल्यालशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.