मध्य रेल्वेवरील दिवा आणि कोपर स्थानाकादरम्यान पहाटे ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणारी लोकल सेवा खोळंबली आहे. त्यामुळे धीम्या-जलद मार्गावरील गाड्या उशीराने धावत आहेत. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असला तरीही या मार्गावरील वाहूतक अतिशय धीम्या गतीने सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने मध्य रेल्वेच्या काही स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत.
There is a disruption in services in the down local line due to a broken Overhead Equipment (OHE) between DIVA and KOPAR at 03:10 hrs. Every effort is being made to minimize the delay. Inconvenience is deeply regretted @Central_Railway @YatriRailways
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) October 7, 2024