राहुरीहून माहूरगडला दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीचा आज पहाटेच्या सुमारास पुसद येथील घाटात अपघात झाला. अपघातात बबन किसन गुलदगड व मनीषा बबन गुलदगड हे पती-पत्नी जागीच ठार झाले. तर, इतर 7 भाविक जखमी झाले. अपघाताची माहिती समजताच, राहुरी शहरात शोककळा पसरली.
राहुरीतील बबन गुलदगड, मनीषा बबन गुलदगड, सारिका सुडके, प्रणव सुडके (रा. तनपुरेवाडी रोड), मयूर रेकुळे, मंदाबाई गटकळ (रा. बुरुडगल्ली), सागर हरी सरोदे, किरण जगधने (रा. लक्ष्मीनगर) हे भाविक मोटारीने रविवारी (दि. 6) रात्री राहुरीतून माहूरगडला निघाले होते. भाविकांची गाडी पुसद येथील खंडाळा घाटातून जात असताना आज पहाटे अपघात झाला. यामध्ये पती-पत्नी ठार झाले, तर 7जण जखमी झाले.