आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या.
मुंबईतल्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांची राज्य राखीव बलाच्या उपपोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली, तर जैन यांच्या बदलीने रिक्त झालेल्या उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तपदी अभिषेक त्रिमुखे यांची वर्णी लागली आहे, तर बंदर परिमंडळाचे उपायुक्त संजय लाटकर यांच्याकडे महाराष्ट्र सायबर विभागाच्या अधीक्षकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय उपायुक्त प्रशांत कदम यांच्याकडे राज्य अनुसुचित जाती-जमाती आयोगाच्या अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हेमराज राजपुत हे महाराष्ट्र सायबर विभागात अधीक्षक असतील. तसेच शिवराज पाटील- अॅण्टी करप्शन ब्युरो (ठाणे), भरत तांगडे- अप्पर पोलीस अधीक्षक (ठाणे), संदीप भाजी भाकरे- उपायुक्त (पुणे) यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.