हिंदुस्थानच्या हवाई दलातील फायटर जेटची ताकद कमी झाली आहे. लढाऊ विमानांची क्षमता 1965 सालापेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे ‘सध्या जे काही आमच्याकडे आहे. त्यातूनच लढण्यास आम्ही कटिबद्ध आहोत’ असे वक्तव्य एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी केले.
हवाई दलाकडे 42 स्क्वाड्रनची स्वीकृत क्षमता आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत या संख्येत घट झालेली दिसून येतेय. जुनी सोव्हिएत युनियनकडून घेतलेली लढाऊ विमाने निवृत्त झाली आहेत. त्यांच्या जागी नवीन विमाने घेण्याचे आदेश अद्याप आलेले नाहीत.
स्क्वाड्रनची ताकद
1965 मध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध झाले होते. त्या वेळी हिंदुस्थानकडे असलेल्या हवाई ताकदीपेक्षा आताची ताकद कमी आहे. सध्या 31 स्क्वाड्रन आहेत. त्यातील मिग 21 विमानांची निवृत्ती लांबणीवर पडली आहे.