सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा नेम नाही. लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींनी हातावर मेहंदी कशी काढायची, याची तयारी सुरू केली असताना आता मार्केटमध्ये घटस्फोटची मेहंदी आली आहे. यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
घटस्फोटाच्या मेहंदीच्या या व्हायरल व्हिडीओत मेहंदीच्या 3 वेगवेगळ्या डिझाईन बनवण्यात आल्या आहेत. सर्वात वर एक जोडपे बनवले आहे. ज्याला कैचीने कापून वेगळे केले आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला तराजूमध्ये घटस्फोटाचे कारण सांगितले आहे. ज्यात लिहिले आहे की, या जोडप्यामध्ये प्रेम खूप आहे. परंतु भांडण दुप्पट आहे. रोजच्या भांडणाला कंटाळून मुलीने घटस्फोट घेतला आहे, तर तिसऱ्या फोटोच्या खाली लिहिले ‘अखेर घटस्फोट…’