भुयारी मेट्रोने प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न साकार झाले. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो- 3 मार्गातील आरे ते बीकेसी या 12.44 किमी लांबीच्या मार्गावर मेट्रो धावली. या मार्गावर एकूण 27 मेट्रो स्थानके असून त्यातील 26 स्थानके भूमिगत आहेत. मुंबई उपनगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी हा टप्पा महत्त्वपूर्ण असून दिवसाला साडेचार लाख प्रवासी मेट्रोने ये-जा करतील, असा एमएमआरसीएलला अंदाज आहे. फोटो – रुपेश जाधव