सर्वत्र नवरात्र उत्सवाची धूम सुरू आहे. मात्र पंजाबमध्ये या उत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली आहे. लुधियानात उत्सवादरम्यान पंडालला आधार देण्यासाठी लावलेला खांब महिलांच्या अंगावर कोसळल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. तर अपघातात 15 महिला जखमी झाल्या आहेत.
जखमी महिलांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सर्व जखमी महिलांची प्रकृती आता स्थिर असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
लुधियानात शनिवारी रात्री नवरात्रीनिमित्त जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी जोरदार वारा सुटल्याने पंडालला आधार देण्यासाठी लावलेला खांब कोसळल्याने ही दुर्घटना घडली.