बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अदनान सामी याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.अदनान सामीची आई बेगम नौरीन यामी यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. नौरीन सामी यांनी सोमवारी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गायक अदनान सामीने आईच्या निधनाची दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मात्र अद्यापही नौरीन सामी यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
अदनान सामीने सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. यामध्ये त्याच्या आईचा फोटो आणि त्यावर 1947 ते 2024 असं लिहिलं आहे. याचसोबत त्याने एक कॅपशन देखील लिहिले आहे. “माझी प्रिय आई बेगम नौरीन सामी खान यांच्या निधनाची बातमी सांगताना मला अत्यंत दु:ख होत आहे.
View this post on Instagram
अदनान सामीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटीनीं शोक व्यक्त केला. अदनानच्या आईच्या निधनामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. याचसोबत त्याच्या अनेक चाहत्यांनीही त्याला धीर दिला आहे. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, ‘काळजी घ्या. देव तुम्हाला या दु:खावर मात करण्याची शक्ती देवो. तर दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘देव त्यांना स्वर्गात सर्वोत्तम स्थान देवो. आई गमावण्यापेक्षा मोठं नुकसान नाही. असे म्हंटले आहे.