कसोटी मालिकेत बांगलादेशला धुळ चारलन्यानंतर टीम इंडियाने पहिल्या टी-20 सामन्यातही बांगलादेशचा 7 विकटने फडशा पाडला. या सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याने कमालीची फलंदाजी आणि गोलंदाजी केली. हार्दिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आणि विराट कोहलीचा विक्रम सुद्धा मोडीत काढला.
बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात झाली असून टीम इंडियाने पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत टीम इंडियाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. त्याने गोलंदाजी करताना 4 षटकांमध्ये फक्त 26 धावा देत 1 विकेट घेतली. तसेच आव्हनाचा पाठलाग करताना 16 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 39 धावा कुटून काढल्या. विशेष म्हणचे षटकार ठोकत त्याने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या षटकारासोबतच हार्दिक पंड्या टी-20 मध्ये सर्वाधिक वेळा षटकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून देणारा क्रमांक 1 चा फलंदाज ठरला आहे. याबाबतीत त्याने विराट कोहलीला मागे सारले आहे.
हिंदुस्थानचा सुस्साट विजय, 49 चेंडू आणि 7 विकेट राखून हिंदुस्थानची विजयी सलामी
हार्दिक पंड्याने पाचव्यांदा षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. तसेच विराट कोहलीने असा पराक्रम आतापर्यंत चार वेळा केला आहे. त्यामुळे याबाबतीत हार्दिक पंड्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे. टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्ध दुसरा टी-20 सामना दिल्लीमध्ये बुधवारी (9 ऑक्टोबर 2024) होणार आहे.