अजितदादा बारामती ते शिरूर, खडकवासला! इंदापूर, वडगाव शेरीचा धांडोळा, भाजपमध्ये अस्वस्थता

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक नसल्याचे वारंवार संकेत दिले आहेत; मात्र याच वेळी अजित पवार यांचा पर्यायी मतदारसंघ कोणता यावरून जिल्ह्यात राजकीय खल सुरू झाला आहे. शिरूर, इंदापूर, खडकवासला की वडगावशेरी या मतदारसंघातून अजित पवार हे चाचणी करीत असून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेमुळे भाजपामधील अस्वस्थता वाढली आहे.

गेल्या आठवड्यात भाजपमधील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, त्यामध्ये जिल्ह्यात दौंड वगळता अन्य कोणत्याही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकाला मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते. याच वेळी शिरूर मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार. म्हणून भाजपने या मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नाहीत. एक प्रकारे शिरूर मतदारसंघ हा अजित पवारांना सोडणार असल्याच्या चर्चेमुळे भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ असून, अजित पवार गटाला थेट विरोध केला आहे. सद्यःस्थितीत अजित पवार गटाकडे तगडा उमेदवार नाही. आयात उमेदवाराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता अजित पवार यांचे नाव पुढे आल्याने रंगत वाढली आहे.

तर दुसरीकडे खडकवासला मतदारसंघ हा अजित पवार यांच्यासाठी सुरक्षित असल्याचा सव्र्व्हे आणि राजकीय निरीक्षण नोंदवले जात आहे, त्यामुळे भाजपचा विडामान आमदार असलेल्या या मतदारसंघाची मागणी अजित पवारांकडून होणार, या शक्यतेने खडकवासलामधील भाजपचे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. याशिवाय अजित पवार गटाकडे असलेले इंदापूर आणि वडगाव शेरी हे दोन मतदारसंघ चाचणी करून पाहिले जात आहेत. गेल्या तीन आठवड्यांत अजित पवार यांनी वडगाव शेरी मतदारसंघात तीन वेळा दौरा केला.

राजकारणाची दिशा मतदार बदलतील! बाळासाहेब थोरात यांचं प्रतिपादन

सुरुवातीच्या टप्प्यात अजित पवार यांनी इंदापूरमधून निवडणूक लढवण्यासंदर्भात संकेत दिले होते. येथील अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दोन दिवसांपूर्वी इंदापुरातून माझी उमेदवारी नक्की आहे का? हेच मला माहीत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मी देईल तो म्हणजे मीच!

अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून मी देईल तो उमेदवार निवडून आणा, असे जाहीर आवाहन केले. त्यावर अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, “मी देईल तो उमेदवार याचा अर्थ मीच उमेदवार असे अजित पवार यांना सांगायचे आहे.” त्यामुळे बारामतीमधून अजित पवार निवडणूक लढवणार नाहीत ही चर्चा तेवढीशी खरी वाटत नाही, अशी पुष्टी त्यांनी जोडली.

ते कधीच भाजपचे होणार नाहीत…

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक वाघोली येथे झाली. शिरूरची जागा भाजपलाच राहिली पाहिजे. पक्षाने ही उमेदवारी देताना निष्ठावंतांना उमेदवारी द्यावी. ज्यांच्या मनात राष्ट्रवादीचे विचार आहेत ते भाजपचे कधीच होणार नाही. याचा विचारही पक्षाने करावा. जयश्री पलांडे म्हणाल्या, “या मेळाव्यामुळे शिरूरमधील भाजपअंतर्गत गटबाजी देखील समोर आली आहे.”

बीआरएस पक्ष राष्ट्रवादीत विलीन