भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नांमुळे पी. डी. हिंदुजा रुग्णालयातील कामगार, कर्मचारी आणि टेक्निशियन यांच्या बढती व विशेष पगारवाढ करण्यासाठी रुग्णालयाच्या मॅनेजमेंटबरोबर यशस्वी वाटाघाटी करण्यात आली असून जवळपास 270 जणांना याचा लाभ मिळणार आहे.
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली चिटणीस राम साळगांवकर यांनी पी. डी. हिंदुजा रुग्णालयामधील कामगार, कर्मचारी आणि टेक्निशियन यांच्या बढती व विशेष पगारवाढ करण्यासाठी रुग्णालयाच्या मॅनेजमेंटबरोबर यशस्वी वाटाघाटी केली.
तसेच कंत्राटी कामगारांनादेखील पगारवाढ मिळावी यासाठी बोलणी करून तत्त्वतः मागणी मान्य करून दिली. याबद्दल पी. डी. हिंदुजा रुग्णालयाचे प्रमुख संचालक सीईओ गौतम खन्ना यांचे चिटणीस राम साळगांवकर यांनी आभार मानले. यावेळी पी. डी. हिंदुजा रुग्णालय मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक जॉय चक्रवर्ती, एचआर प्रमुख जगदीप चौहान, सुरेश जाधव तसेच युनिट कमिटी अध्यक्ष अमित भाटे, सरचिटणीस योगेश कापडोसकर यांच्यासह इतर कमिटी सदस्य आणि कार्यकारिणी सदस्य हजर होते.