पुण्यात पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. मावळ तालुक्यात भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दाम्पत्याचा जागीच करुण अंत झाला. पीडित दाम्पत्य एका कार्यक्रमाहून घरी परतत असताना ही घटना घडली. गणेश दत्तात्रय चोपडे आणि अर्चना गणेश चोपडे अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत.
मावळ तालुक्यातील नायगाव येथे राहणारे चोपडे दाम्पत्य शनिवारी रात्री एका देवाच्या कार्यक्रमाहून घरी परतत होते. यादरम्यान साडेदहाच्या सुमारास वाटेत असतानाच भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
चोपडे दाम्पत्याला दोन लहान मुलं आहेत. या घटनेमुळे दोन्ही मुले आई-वडिलांच्या प्रेमाला मुकली आहेत. चोपडे दाम्पत्याच्या निधनाने नायगाव गावावर शोककळा पसरली आहे.