अॅप्पल कंपनीने आयओएस 18.1 अपडेट केले आहे. त्यामुळे आयफोनचा वापर करणे युजर्ससाठी अधिक सोपे होणार आहे. आयओएस 18 नंतर तीन आठवड्यांनंतर 18.1 अपडेट आणले आहे. त्यामुळे आयफोन युजर्सची बग किंवा त्रुटींपासून सुटका होणार आहे. कॅमेऱ्याची समस्यादेखील नसेल. याशिवाय आयफोन 16वर मायक्रोफोन अॅक्सेससाठी आणि पासवर्ड अॅप अॅक्सेससाठीदेखील या फोनचा वापर अधिक सोपा असणार आहे. अॅप्पल आयओएस 18.1 बिल्ड नंबरला 22ए3370 वर अपडेट करतो. आयफोनमधील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने हे अपडेट करण्यात आले आहे.
हे अपडेट एलिजिबल असलेल्या सर्व आयफोन मॉडेल्ससाठी लागू असणार आहेत. हे नवीन अपडेट आयफोनला अधिक सुरक्षा प्रदान करेल आणि सर्व त्रुटींवर उत्तम उपाय ठरेल असा दावा कंपनीने केला आहे. या नव्या अपडेटमुळे आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रो मॉडेलवर टचस्क्रीन आणि अनरिस्पॉन्सिव यांसारख्या समस्यांपासूनदेखील आयफोन युजर्सची सुटका होणार आहे.
नवीन अपडेटसाठी काय करावे?
नवीन अपडेट इन्स्टॉल करावे लागेल. ही अतिशय सोपी प्रक्रिया आहे. त्यासाठी आयफोनमध्ये सेटिंग्समध्ये जावे लागेल. त्यानंतर जनरलवर क्लिक करून मग सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करा. क्लिक करताच अपडेट फोनमध्ये डाऊनलोड होईल आणि इन्स्टॉलदेखील होईल.