शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी टेंभी नाका येथे स्थापन केलेल्या दुर्गेश्वरी मातेचे सौ. रश्मी ठाकरे यांनी रविवारी दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे यांनी देवीची ओटी भरून महाआरतीही केली. महाराष्ट्राला सुख संपत्ती आनंद स्थैर्य लाभू दे अशी प्रार्थना रश्मी ठाकरे यांनी यावेळी केली. यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिकांची प्रचंड गर्दी टेंभी नाका येथे उसळली होती