रेल्वेची सुधारणा नाही, तर उद्ध्वस्त करण्याचा डाव, भरती प्रक्रियेवरुन जयराम रमेश यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) नागरी सेवा परीक्षा आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे अधिकाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतला आहे. या निर्णयावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश य़ांनी हे रेल्वे सुधारण्याचे प्रकरण नसून खऱ्या अर्थाने रेल्वेला बरबाद करण्याचे प्रकरण असल्याचे म्हंटले आहे.

कांग्रेसचे सरचिटणील जयराम रमेश यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यापोस्टद्वारे जयराम रमेश यांनी केंद्रातील मोदी सरकारवर अनेक आरोप केले आहेत. पाच वर्षांपूर्वी, नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या सरकारने आठ रेल्वे सेवा या भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS) मध्ये विलीन केल्या आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षेद्वारे होणारी भरती बंद केली. यानंतर 5 ऑक्टोबर 2024 रोजी, सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि आता एक नागरी सेवांसाठी आणि एक अभियांत्रिकी सेवांसाठी अशी दोन स्वतंत्र परीक्षांद्वारे भरती करणे सुरू ठेवली. हा निर्णय या चिंतेच्या विचाराने घेतला गेला. असे काही आरोप त्यांनी मोदी सरकारवर केले.

“नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांची विचार न करता निर्णय घेण्याची ही सवय आमच्या संस्थांसाठी धोकादायक आहे. रेल्वे ही मूलभूतपणे एक अभियांत्रिकी प्रणाली आहे आणि सर्व भरती मानकीकृत करण्याच्या घाईत हे सत्य जाणूनबुजून विसरणे हे मूर्खपणाचे लक्षण होते. असा हल्लाबोल यावेळी जयराम रमेश यांनी केला.