‘इस्रायलने इराणला प्रत्युत्तर द्यावे पण…’, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांनी नेतन्याहूसमोर ठेवली अट

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्धाचा भडका थांबण्याचे नाव घेत नाही. इस्रायल सातत्याने लेबनॉनवर हल्ले करत आहे. अशातच इराण आणि इस्रायलमध्ये पुन्हा युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अमेरिकेकडून एक मोठे वक्तव्य करण्यात आले आहे. ‘इस्रायल इराणला प्रत्युत्तर देऊ शकतो, पण त्याला देखील हल्ल्यात सावध राहण्याची गरज आहे. मात्र इराणच्या आण्विक प्रकल्पांवर हल्ले करू नका, असे आवाहन बाइडेन यांनी इस्रायलला केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या तणावपूर्वक वातावरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इराणवरील क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायलने केलेल्य़ा हल्ल्याचे समर्थन आम्ही करणार नाही, असे जो बियडेन यांनी सांगितले. त्याने इस्त्राईलला आवश्यक तेवढी कारवाई करण्याचे आवाहन केले. इराणने इस्रायलवर केलेल्या 180 हून अधिक क्षेपणास्त्रे हल्ल्याच्या एका दिवसानंतर बिडेन यांनी हे वक्तव्य केले.

इस्रायलचे माजी पंतप्रधान नफताली बेनेट यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. ‘गेल्या 30 वर्षांपासून इराणने इस्रायलच्या लोकांवर दहशत निर्माण केली आहे. इराणने हिजबुल्ला, हमास, इस्लामिक जिहाद आणि इतर – इस्रायलला वेढा घालण्यासाठी आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आपले दहशतवादी नेटवर्क पाठवले . इराण सरकारने या दहशतवाद्यांना पैसा, प्रशिक्षण आणि शस्त्रे पुरवली. मात्र जर इस्त्रायलकडे समाधानकारक तंत्रज्ञान नसते तर या क्षेपणास्त्रांमुळे हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला असता. असे ते यावेळी म्हणाले.

इस्त्रायलचे माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी त्यांच्या X हँडलवर काही दिवसांपूर्वीच एक ट्विट केले होते. आता इराणच्या आण्विक प्रकल्पांविरोधात कारवाई करण्याची वेळ आली आहे. त्यांची केंद्रीय ऊर्जा केंद्रे पूर्णपणे नष्ट करा. जेणेकरून दहशतवाद्यांचे साम्राज्य संपुष्टात येईल. असे त्यांनी ट्विटद्वारे नमूद केले होते.