Maharashtra assembly election 2024 – कोथरूडच्या जागेवरही राष्ट्रवादीचा दावा; चंद्रकांत पाटलांची अडचण

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पुणे, पिंपरी- चिंचवड आणि जिल्ह्यात महायुतीत खदखद सुरू झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने चिंचवड पाठोपाठ आता कोथरूड मतदार संघावरच दावा ठोकला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी विजय डाकले यांनी कोथरूडमधून विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने महायुतीत पुण्यातील जागांवरून तिढा निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कोथरूडमधून निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छूक असल्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कळविले असल्याची माहिती विजय डाकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. चिंचवडच्या जागेचा प्रश्न सुटतोय ना तोच डाकले यांनी कोथरूडच्या जागेवर दावा केल्याने महायुतीतील खदखद चव्हाट्यावर आली आहे.

चिंचवडची जागा घा; अन्यथा काम करणार नाही! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचा अजित पवारांना इशारा

महायुतीच्या सूत्रानुसार कोथरूडमध्ये भाजपचा आमदार असल्याने ही जागा भाजपकडे कायम राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी कोथरूडची जागा राष्ट्रवादीलाच मिळेल, असा विश्वास डाकले यांनी व्यक्त केला. कोथरूडमधून उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्ते आणि समाजबांधवांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही डाकले यांनी स्पष्ट केले.

आमदार विजय देशमुख हे अफझलखानाची अवलाद! भाजपचे हेमंत पिंगळे यांचा हल्लाबोल

डाकले हे निवडणूक लढवण्यावर ठाम असून, त्यांनी तयारीदेखील सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील आमदार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापुढे अडचण निर्माण होणार आहे.

अजित पवारांमुळेच माझा पराभव