हिंदुस्थानी दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने फेक कॉल्स आणि मेसेजला आळा घालण्यासाठी अनेक कडक नियम लागू केले आहेत. त्यामुळे आता यूजर्सला येणारे फेक कॉल्स आणि मेसेजला ऑपरेट लेवलवर ब्लॉक करण्यात येणार आहे. ट्रायने पुन्हा एकदा स्कॅमर्सला दणका देत 18 लाखांहून जास्त मोबाइल नंबर गेल्या 45 दिवसांत ब्लॉक केले आहेत. ट्रायने आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती दिली. फेक कॉल आणि मेसेज करणाऱया नंबरविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश सर्विस प्रोव्हाईडर्संना देण्यात आले आहेत, असेही ट्रायने म्हटले आहे. याआधी ट्रायने वेगवेगळ्या कारवाईदरम्यान 1 कोटींहून अधिक मोबाईल नंबरवर कारवाई करण्यात आली आहे. या नंबरला बंद करण्यात आले आहे. गेल्या महिन्यातसुद्धा ट्रायने 3.5 लाख मोबाइल नंबर बंद केले होते. डॉट आणि ट्रायने एकत्र येत यूजर्संना स्पॅम फ्री सर्विस देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सप्टेंबर महिन्यातही ट्रायने 3.5 लाख अन-व्हेरिफाईड एसएमएस हेडर आणि 12 लाख कॉन्टेंट टेम्प्लेटला ब्लॉक केले.
नवा नियम लागू
ट्रायने 1 ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू केले असून यानुसार, नेटवर्क ऑपरेटर्सने टेक्नोलॉजीचा वापर करताना यूआरएल, एपीके लिंक, ओटीटी लिंकच्या मेसेजला ब्लॉक करण्याचे निर्देश दिले. यूआरएल असलेले कोणतेही मेसेज यूजर्सपर्यंत पोहोचू नये, असे निर्देश टेलिकॉम कंपन्यांना दिले आहेत. स्पॅम कॉलपासून दिलासा देण्यासाठी ट्रायने कंबर कसली आहे.