मुंबईत विलेपार्ले येथे शिवसेना नेते, आमदार ॲड. अनिल परब यांच्यातर्फे ‘महा नोकरी’ मेळाव्याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी युवासेना प्रमुख, शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, शिवसेना व युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे उपस्थित होते.