>> जया फोंडके
कोलकात्यात 80 फूट उंच अशी देवीची मूर्ती बनविण्यात आली होती. कोलकात्यात देशप्रिया पार्क येथे ही मूर्ती बनविण्यात आली. स्टार सिमेंट नावाच्या कंपनीने हा खर्च केला. याची प्रसिद्धी करण्यासाठी प. बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, झारखंड, बिहारमध्ये मोठय़ा जाहिराती लावण्यात आल्या. ही मूर्ती सिमेंटपासून बनविण्यात आली. ही मूर्ती मिंटू पॉल यांनी बनविली.
कोलकात्यात दोनशे वर्षांचे प्राचीन कालीघाट काली मंदिर आहे. हे मंदिर 1809 मध्ये बांधण्यात आले. या देवीच्या मूर्तीचे चारही हात पूर्ण सोन्याचे आहेत. कोलकात्यातच 160 वर्षांचे आणखी एक दक्षिणेश्वर काली मंदिर आहे. हे मंदिर 1855 मध्ये समाजसुधारक रानी राशमोनी यांनी बांधले. हे मंदिर हुगळी नदीच्या किनाऱयावर आहे. रामकृष्ण परमहंस हे या देवीचे पुजारी होते.