Bhiwandi Fire: भिवंडीतील लॉजिस्टीक गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी

भिवंडीतीस वाशिंद गावात लॉजिस्टिक गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळाल्यानंतर भिवंडी, कल्याण आणि ठाणे येथून सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. सुदैवानेया घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

मुंबई-नाशिक महामार्गाजवळ ही घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले आहे. भिवंडीतील व्ही लॉजिस्टीक गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लॅस्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा होता. आगीमुळे गोदामात ठेवलेला सर्व माल जळून राख झाला. मात्र किती रुपयांच्या मालाचे नुकसान झाले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.