Kolkata आरजी कार पीडितेचा चेहरा उघड करणाऱ्या सोशल मीडिया अकाउंटला पोलिसांची नोटीस; बांगलादेशसह अन्य देशातील IP चाही वापर?

RG-Kar-Hospital-Kolkata

कोलकाता पोलिसांनी अशा 25 सोशल मीडिया अकाउंटला नोटीस धाडली आहे ज्या अकाउंटवरून आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बलात्कार आणि हत्या झालेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरची ओळख उघड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी काही अकाउंटसचे आयपी अॅड्रेस बांगलादेशसह विदेशात असल्याचे कळते आहे.

विविध अकाउंटना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्या हँडलर्सना लालबाजार पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक विदेशी खात्यांचीही चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान असेही आढळून आले की यापैकी काही पोस्ट विदेशांतील आयपी आयपी अॅड्रेस वापरून करण्यात आल्या होत्या संबंधित सोशल मीडिया अकाउंटला देखील नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

पीडितेच्या पालकांकडून बाजू मांडणाऱ्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काही सोशल मीडिया अकाउंटवरून तिचे फोटो काढण्यात आलेले नाहीत.

31 वर्षाच्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर 9 ऑगस्ट रोजी आरजी कार हॉस्पिटलमध्ये बलात्कार आणि हत्या करण्यात आल्याचे आढळून आले. तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे आणि तिच्या खासगी अवयवानां खोल जखमा असल्याचे समोर आले होते.

पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी मुख्य आरोपी संजय रॉय याला अटक केली.

सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि पोलीस निरीक्षक यांनाही या प्रकरणात पुराव्याशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.