शिवसेना कायदेविषयक अंगीकृत संघटना शिव विधी व न्याय सेना, महाराष्ट्रच्या वतीने उद्या, 5 ऑक्टोबरला नवरात्रीनिमित्त महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने ‘महिलांचे हक्क आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे’ या विषयावर शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मांटुगा येथील लायन डॉ. अशोक मेहता सभागृहात, षण्मुखानंद हॉल येथे सहाव्या मजल्यावर सायंकाळी 4 ते 7 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमाला रश्मी ठाकरे, शिवसेना उपनेत्या-खासदार प्रियंका चतुर्वेदी, शिवसेना उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, सुषमा अंधारे आणि काँग्रेस पक्षाच्या खासदार वर्षा गायकवाड यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या उपाध्यक्ष अॅड. सुरेखा गायकवाड असणार आहेत. यावेळी त्यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष अॅड. नीतिश सोनावणे, चिटणीस अॅड. सुमित घाग, चिटणीस अॅड. ज्ञानेश्वर कवळे, मुख्य समन्वयक अॅड. भूषण मेंगडे, महाराष्ट्र सदस्य अॅड. गिरीश दिवाणजी, मीडिया समन्वयक अॅड. दर्शना जोगदनकर यांच्यासह संघटनेचे वकील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी महिला आघाडीच्या वतीने आणि विविध शाखांमधून मोठय़ा संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत.