महिलांचे हक्क आणि अंमलबजावणी करण्यासाठीचे कायदे’ विषयावर शिबीर

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कायदे विषयक अंगीकृत संघटना शिव विधी व न्याय सेना, महाराष्ट्रच्या वतीनं येत्या 5 ऑक्टोबरला नवरात्रीनिमित्त महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशानं महिलांचे हक्क आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे’ या विषयावर शिबीर आयोजित करण्यात येत आहे. हा कार्यक्रम माटुंगातल्या लायन डॉ. अशोक मेहता सभागृहात, षण्मुखानंद हॉल, 6 व्या मजल्यावर 4 ते 7 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मा. सौ. रश्मीताई उद्धवजी ठाकरे वहिनीसाहेब, आपल्या पक्षाच्या उपनेत्या आणि माजी महापौर विशाखाताई राऊत, पक्षाच्या उपनेत्या, खासदार, राज्यसभा सदस्य प्रियंकाताई चतुर्वेदी, उपनेत्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, पक्षाच्या उपनेत्या, प्रा. सुषमाताई अंधारे आणि काँग्रेस पक्षाच्या खासदार माननीय वर्षाताई गायकवाड यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेच्या उपाध्यक्ष अ‍ॅड. सुरेखा गायकवाड असणार आहेत, यावेळी त्यांच्यासह संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नितिश सोनावणे, चिटणीस अ‍ॅड सुमीत घाग, चिटणीस अ‍ॅड ज्ञानेश्वर कवळे, मुख्य समन्वयक अ‍ॅड. भूषण मेंगडे, महाराष्ट्र सदस्य अ‍ॅड. गिरीश दिवाणजी, मीडिया समन्वयक अ‍ॅड. दर्शना जोगवनकर यांच्यासह संघटनेचे वकील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, यावेळी महिला आघाडीच्या वतीनं आणि विविध शाखांमधून मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत.

आपण या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही आपणास नम्र विनंती,

ती वस्तू नाही भोगाची तर देवता आहे सगळ्यात मोठ्‌या त्यागाची,
सशक्त नारी घडवते सशक्त समाज,
तेव्हा आता होऊया दक्ष, श्री शिक्षण हेच आपले लक्ष्य.
घरची गौरीच आहे
आता बाहेरची दुर्गा…