बापरे! सूर्यावर आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या ज्वाळा

ऑक्टोबर सुरू होताच तापमान वाढीत लक्षणीय बदल झालेला पाहायला मिळतोय. त्यातच आता अंतराळ संशोधन संस्था नासाने सूर्यावर झालेल्या स्फोटाबद्दलची माहिती दिली आहे. सूर्यावर आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या ज्वाळा आल्याचे नासाने सांगितले आहे. तज्ञांच्या मते मागील नऊ वर्षांपेक्षा या ज्वाळा कित्येक पटीने जास्त आहेत.

 गुरूवारी, 3 ऑक्टोबर रोजी सूर्यावर शक्तिशाली स्फोटाची नोंद नासाच्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेने केली आहे. सूर्यावरील हा स्फोट इतका मोठा होता की सूर्याच्या ज्वाळेमुळे पृथ्वीवरील वरच्या वातावरणाचे आयनीकरण झाले.

 या स्फोटामुळे आफ्रिका आणि दक्षिण अटलांटिकाच्या काही भागांवर शॉर्टवेव्ह रेडिओ ब्लॅकआउट झाला, ज्यामुळे 30 मिनिटांपर्यंत सिग्नल तुटले. तर पृथ्वीवरील काही देशांमध्ये देखील सेटलाईट्सवर परिणाम झालेला पाहावयास मिळाला.