डॉक्टरने तोडले झाड : 50 हजारांचा दंड वसूल

वृक्ष प्राधिकरणाची मान्यता न घेता बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांना एका झाडासाठी 50 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यानुसार महापालिकेकडून नारळीबाग येथील एका डॉक्टरने झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी घेऊन चक्क झाड तोडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित डॉक्टरकडून 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरात बेकायदा वृक्षतोड करणाऱ्यांच्या विरोधात महापालिकेने मोहीम सुरू केली. अनेक जण फांद्या तोडण्याची परवानगी घेऊन संपूर्ण झाडावर कुऱ्हाड चालवित आहेत, तर काही ठिकाणी एक-दोन झाडे तोडण्याची परवानगी घेऊन प्रत्यक्षात जास्त झाडे तोडत आहेत. अशा नागरिकांना चाप लावला जात आहे. नारळीबाग येथील डॉ. अभिजित गोरे यांनी 16 ते 17 वर्षे जुन्या लिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी मनपाकडून घेतली होती. मात्र, त्यांनी हे झाडच तोडल्याचे समोर आले.