100, 200 रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि निवडणुकांवर डोळा ठेवून केलेल्या इतर घोषणांसाठी निधी अपुरा पडू लागल्याने सरकारने स्टॅम्प पेपरच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 100 आणि 200 रुपयांचे स्टॅम्प पेपर बंद करून त्याऐवजी 500 रुपयांचे स्टॅम्प विकले जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांवर मोठा आर्थिक भुर्दंड पडणार आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. त्यात 100 आणि 200 रुपयांचे मुद्रांक शुल्क बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.