मध्य पूर्वेतील तणावामुळे हिंदुस्थानात येणाऱ्या विमान प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतोय. विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत मार्गात बदल केलाय. त्यामुळे विमान प्रवास लांब पल्ल्याचा आणि महाग झाला आहे. शेजारील काही देशांनी तर आपले हवाई क्षेत्र बंद केलंय. त्यामुळे विमान कंपन्यांना पर्यायी मार्गाचा विचार करावा लागत आहे. गुगल फ्लाईटच्या अहवालानुसार, तेल अवीवसाठी सर्वात स्वस्त तिकीट साधारणपणे 71 हजार ते 1 लाख 35 हजार पाऊंड दरम्यान असते. बुधवारी ही किंमत 2 लाख 22 हजार पाऊंड्सपेक्षा जास्त झाली. तज्ञांच्या म्हणण्यानुसार तिकीट दर आणखी वाढतील.हिंदुस्थान सरकारने नागरिकांना ईराणची यात्रा आवश्यक असेल तरच करण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक सध्या इराणमध्ये राहत आहेत, त्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.