‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या ‘लाफ्टर शेफ’ शोमध्ये दिसत आहे. या शोच्या सेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यावरुन अंकिता काहीतरी गूड न्यूज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
‘लाफ्टर शेफ’ हा कॉमेडीन शो आहे. शोच्या नवीन प्रोमोमध्ये अंकिता लोखंडे पोट दुखत असल्याची तक्रार करत आहे. मात्र यावेळी इतरांनी ही प्रेग्नेंसीची लक्षणे असल्याचे म्हणत तिची मजा घेताना दिसत आहेत. ‘लाफ्टर शेफ’च्या नवीन प्रोमोनुसार, या शोमध्ये मुनावर फारुकी पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. प्रोमोच्या सुरुवातीला विकी जैन अंकिता लोखंडेला विचारतो की, तू ठीक आहेस का? यावर उत्तर देताना, ती पोटात दुखत असल्याची तक्रार करते. तिचं पोट दुखत असल्याचं पाहून सर्वजण तिच्याभोवती गोळा होतात. मुनव्वर फारुकी म्हणतो, ‘तिला चक्कर आली आणि ती पडली. चांगली बातमी आहे का?’ दरम्यान, अली गोनीनं तिने पाय जड झाल्याची म्हणजेच ती प्रेग्नेंट असल्याचे गमतीने बोलताना दिसत आहे. यावेळी अर्जुन बिजलानी, भारती सिंह, रीम शेख आणि इतर कलाकार तिच्याभोवती नाचू लागतात. त्यानंतर विकीने अंकिताच्या कपाळावर किस केले.
Ankita ko dekh kar udd gaye sab ke fuse, kya woh dene waali hai koi good news? 🤩❤️
Dekhiye #LaughterChefs – Unlimited Entertainment har Thursday & Friday raat 10:00 baje se sirf #ColorsTV aur @JioCinema par.@munawar0018 @jainvick @anky1912 @bharti_lalli @jannat_zubair29… pic.twitter.com/K22QIChZ7Q
— ColorsTV (@ColorsTV) October 2, 2024
विकी आणि अंकिताकडून याबाबत काही अधिकृत माहिती आलेली नाही.