आधी भाजप उमेदवारासाठी प्रचार, मग तासाभरात काँग्रेस प्रवेश

हरयाणात एका नेत्याने आधी भाजपसाठी प्रचार केला. त्यानंतर तासाभरात काँग्रेसच्या मंचावर जात काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. अशोक तंवर असे या नेत्याचे नाव असून ते माजी खासदार आहेत.

अशोक तंवर दुपारी बारा वाजता नलवा भागात भाजपसाठी प्रचार कत होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते कुलदीप बिश्नोई आणि राजेंद्र राठोडही उपस्थित होते. यावेळी भाजपला मतदान करा असे आवाहनही त्यांनी केले होते. त्यानंतर तासाभराने राहुल गांधी यांची प्रचारसभा होती. तंवर या प्रचारसभेला आले आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक तंवर यांनी सिरसा भागातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण काँग्रेस उमेदवार कुमारी सैलजा यांनी तंवर यांचा पराभव केला. आता काँग्रेसमध्ये सामील होण्यापूर्वी तंवर यांनी सोनिया गांधी यांची भेटही घेतली होती.