झारखंडमध्ये रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला, रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन निघाले बोगस

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमार्गात अडथळे निर्माण करून रेल्वेगाडय़ा डीरेल करण्याचा कट रचणाऱयांना गजाआड करून अशा घटना रोखण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, रेल्वेमार्गावर घातपात घडवण्याचे प्रकार सुरुच आहेत. झारखंडच्या साहिबगंज येथे काही समाजकंटकांनी स्फोट घडवून रेल्वे ट्रॅकच उडवून दिला. लालमटिया ते फरक्काच्या दिशेने जाणाऱया एमजीआर रेल्वे मार्गावर ही घटना घडली. या घटनेनमुळे मोठय़ा संख्येने रेल्वेगाडय़ा रद्द कराव्या लागल्या. दरम्यान, या स्फोटामुळे रेल्वेमार्गावर तब्बल 3 फूट खड्डा पडला. रेल्वे ट्रकपासून 40 मीटर दूर अंतरावर रेल्वे रुळाचे अवशेष पडलेले आढळले.

z राजस्थानातील विविध रेल्वे स्थानकेs बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे पत्र हनुमानगढ रेल्वे स्टेशनमधील रेल्वे अधिकाऱयांना मिळाले. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नावाने हे पत्र आले. गंगानगर, हनुमानगढ, जोधपूर, बिकानेर, कोटा, बुंदी, उदयपूर. जयपूर ही रेल्वे स्थानके 30 ऑक्टोबर रोजी बॉम्बने उडवून देण्याची धमकी या पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे

नवरात्रोत्सव कलश यात्रेनिमित्त शिवसेना नेते विभागप्रमुख आमदार सुनील प्रभू यांच्यामार्फत शिवसेना शाखा क्र. 44 दिंडोशीवाडी जय माता दी मित्र मंडळ या ठिकाणी 1200 महिलांना मोफत साडी वाटप करण्यात आले. यावेळी शाखाप्रमुख सुभाष धानुका, शाखासंघटक निशा कांबळे यांच्यासह शिवसैनिक, स्थानिक महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.