10 ऑक्टोबरला महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा?

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यातील निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात पोहचली आहे. जम्मू-कश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाल्यावर दोनच दिवसांत 10 ऑक्टोबरला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाच्या वरचेवर होत असलेल्या बैठका आणि बैठकांमधील सरकारचा निर्णयांचा धडाका पाहता पुढील आठवडय़ात विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. जम्मू-कश्मीर आणि हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. त्यानंतर 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय आयोग करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.