बदलापूर अत्याचार प्रकरणातील सह आरोपी तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना अटक करण्यात आली आहे. बदलापूरात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर दोन्ही आरोपी फरार होते. आता कर्जतच्या एका फार्म हाऊसमधून त्यांना अटक करण्यात आली आहे.
बदलापूरच्या ज्या शाळेत ही घटना घडली होती. त्या शाळेचे संस्थापक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे फरार होते. काल मंगळवारी कोर्टाने दोघांचा अटक पूर्व जामीन फेटाळला आहे. आरोपींना मुलींवरील लैंगिक अत्याचाराची पूर्ण कल्पना होती. त्यांनी त्या प्रकाराबाबत तातडीने पोलिसांना कळवायला हवे होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते आणि दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता.