कळंब जिल्हा परिषद विभागातील खांडस, नांदगाव आणि मौजे गावंडेवाडी, टेपावाडी, चाफेवाडी, भोमलवाडी, भोपलेवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी त्यांचे शिवबंधन बांधून स्वागत केले. वाड्या, पाड्यावर शिवसेनेची मशाल धगधगेल आणि पुढचा आमदार हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाच होईल अशी शपथच या आदिवासी बांधवांनी घेतली.
माजी उपतालुकाप्रमुख दिनेश भोईर यांच्या पुढाकाराने दोन गावे आणि पाच पाड्यातील शेकडो आदिवासींनी शिवसेनेत प्रवेश केला. रायगड जिल्हा सल्लागार गजानन पाडघे, तालुका संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर, तालुका संघटक बाबू घारे, विधानसभा अधिकारी अॅड. संपत हडप, माजी तालुकाप्रमुख राजाराम शेळके, उपतालुकाप्रमुख असीम बुबेरे, बाजीराव दळवी, माजी विभागप्रमुख माधव कोळंबे, विभागप्रमुख लक्ष्मण पोसाटे, संघटक संतोष घाडगे, रामदास ठोंबरे, शाखाप्रमुख संतोष मोडक, संतोष चोखट, केशव वांजळे, मंगल मिरकुटे, धनश्री चंदन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.