श्वानदंश, सर्पदंशाच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’

सातारा जिह्यात वाढत्या श्वानदंश व सर्पदंशाच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ झाली आहे. जिह्यातील जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, 84 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 415 आरोग्य उपकेंद्रे, आयुर्वेदिक दवाखाने 19 अशा सर्व ठिकाणी श्वानदंश व सर्पदंशाची लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे डॉ. महेश खलिपे यांनी सांगितले.

सर्पदंशावर आरोग्य विभागामार्फत उपाययोजना राबविल्या जात आहेत. अँटी रॅबिज क्हॅक्सिन प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर एक हजार 857 क्हाइल्स, तर जिल्हा परिषद औषध भांडार विभागात पाच हजार 275 व्हॅक्सिन्स अशा मिळून सात हजार 132 अँटी रॅबिज व्हॅक्सिन व्हाइल्स उपलब्ध आहेत. अँटी स्नेकच्या एक हजार 706 व्हाइल्स व जिल्हा परिषदेच्या औषध भांडार विभागात 386 व्हाइल्स अशा मिळून दोन हजार 91 अँटी स्नेक व्हॅक्सिनच्या व्हाइल्स उपलब्ध आहेत.

1 जानेवारी ते 22 सप्टेंबर या कालावधीत जावली तालुक्यात 9, कराड 4, खंडाळा 5, खटाव 17, कोरेगाव 8, महाबळेश्वर 14, माण 6, पाटण 20, फलटण 49, सातारा 179, काई 4 अशा मिळून 315 नागरिकांना सर्पदंश झाला आहे. श्वानदंशाचे प्रमाण जिह्यात जास्त आहे. त्यामध्ये जावली तालुक्यात 520, कराड दोन हजार 454, खंडाळा एक हजार 15, खटाव एक हजार 449, कोरेगाव एक हजार 468, महाबळेश्वर 348, माण एक हजार 772, पाटण एक हजार 165, फलटण दोन हजार 99, सातारा एक हजार 995, वाई एक हजार 581 अशा मिळून 15 हजार 866 जणांना श्वानदंश झाला आहे.