पुष्पुर येथील अल्बर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या 34 व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो–खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची कामगिरी केली. आता उपांत्य फेरीत मुलींचा संघ राजस्थानशी भिडेल तर मुलांची लढत ओडिशाविरुद्ध होईल.
आज सकाळी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने विदर्भ संघावर 1 डाव आणि 20 गुणांच्या फरकाने विजय मिळवला. महाराष्ट्राच्या सिद्धी भोसले, वेदिका कामखेडेने उत्पृष्ट संरक्षण केले तर श्रावणी तामखेडेने दोन्ही डावात अष्टपैलू खेळ करून दाखविला. गौरी यादव आणि ईश्वरी सुतारने प्रत्येकी 3 गडी बाद केले, तर विदर्भ संघाकडून दुर्गा गवताडेने 1.30 मी. संरक्षण करताना 1 गडी बाद केला. मुलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राच्या मुलांनी पश्चिम बंगालचा 28 गुणांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.