एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नुकतीच हिंदुस्थानी हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी त्यांनी पदभार स्वीकारला. यानंतर राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे त्यांनी पदस्पस्पर्श करत आईचा आशीर्वाद घेतला. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही हा व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर करत प्रत्येकाच्या आयुष्यातील कमांडर-इन-चीफ आईच असते असे म्हटले आहे.
हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल विवेक राम चौधरी 30 सप्टेंबर रोजी निवृत्त झाले. त्यांच्या जागी एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. अमर प्रीत सिंग आतापर्यंत हवाई दलाचे उपप्रमुख या पदावर होते. त्यांना रोटरी विंग एअरक्राफ्टवर 5 हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन्स आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्वही केले आहे.
Beautiful
Everyone’s REAL Commander-in-Chief—Our mothers.pic.twitter.com/lqygUGKJaB
— anand mahindra (@anandmahindra) October 1, 2024
एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 रोजी झाला. डिसेंबर 1984 मध्ये ते वायुदलामध्ये फायटर पायलट म्हणून रुजू झाले. 40 वर्षापासून ते वायुदलामध्ये कार्यरत असून कमांड, स्टाफसह निर्देशात्मक भूमिकाही त्यांनी बजावल्या आहेत.