ग्लॅमरस अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. आता उर्वशी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. .यापूर्वी उर्वशीचे नाव अनेकदा वेगवेगळ्या क्रिकेटर्ससोबत जोडले गेले आहे. आधी तिचे नाव टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि आता पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहसोबत जोडले गेले. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती तिच्या आवडत्या पाकिस्तानी क्रिकेटरचा उल्लेख करताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्री उर्वशीला तिच्या आवडच्या पाकिस्तानी क्रिकेटर बद्दल विचारण्यात आले. यावर तिने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज नसीम शाहचे नाव घेतले. पाकिस्तान चांगला संघ आहे आणि नसीम शाह माझा आवडता आहे. असे उर्वशी यावेळी म्हणाली. यानंतर उर्वशीचा हा व्हि्डीओ प्रचंड व्हायरल झाला. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या.
काही लोकांनी या व्हिडीओवरून उर्वशी रौतेलाला खूप ट्रोल केले आहे. लोकांनी उर्वशीविरोधात कमेंट्स करून तिला इशाराही देण्यात आला आहे. काही चाहत्यांनी उर्वशीला नसीम शाहपासून दूर राहण्यास सांगितले आहे. चाहत्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपला संताप व्यक्त केला आहे. उर्वशी रौतेलाला अशा प्रकारे ट्रोल करणाऱ्यांपैकी बहुतेक जण पाकिस्तान क्रिकेट आणि नसीम शाहचे चाहते असण्याची शक्यता आहे.
उर्वशी रौतेला आणि नसीम शाह यांची नावे याआधी देखील जोडले गेले होते. काही वर्षांपूर्वी उर्वशी रौतेला नसीम शाहसोबतच्या नात्याच्या अफवांमुळे चर्चेत होती. त्या अफवांनंतरही तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. मात्र, नसीम शाह यांनी एका मुलाखतीत उर्वशी कोण आहे हे मला माहीत नाही असे सांगून त्या अफवांना पूर्णविराम दिला होता.