शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी ( 29 सप्टेंबर 2024 ) पुन्हा एकदा भाजप नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कुटील कारस्थानाचा बुरखा टराटरा फाडला. चार दिवसांपूर्वी अमित शहा नागपुरात येऊन गेले. बंद दाराआड बोलले… उद्धव ठाकरेंना संपवा, शरद पवारांना संपवा. अहो अमित शहा, हे बंद दाराआडचे धंदे बंद करा आणि हिंमत असेल तर मैदानात या. शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा, असे जाहीर आव्हान देत उद्धव ठाकरे यांनी अमित शहांवर घणाघाती हल्ला केला.