Bus Accident : पुण्यात चालकाचे नियंत्रण सूटून ST बसला भीषण अपघात, 42 प्रवासी जखमी

रस्ते अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. पुण्याच्या भोरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली आहे. भोर तालुक्यातील महुडे येथील भोरकडे प्रवासी घेऊन येत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस थेट शेतात घुसली. सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात होऊन बसमधील 42 जण किरकोळ जखमी झाले. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.

बस अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने भोर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी झालेल्या तिघांना अति दक्षता विभागात ठेवण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.