‘प्रोडक्ट शोकेस’ने शिकवले नवीन तंत्रज्ञान

विद्यावर्धिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय येथे प्रोडक्ट शोकेस 2024 संपन्न झाला. या कार्यक्रमात सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची संधी दिली. कॉम्प्युटर विभागाने अबॅकस कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग – डाटा सायन्स या विभागाने प्रोडक्ट विद्या आणि इन्पर्ह्मेशन टेक्नॉलॉजी विभागाने एलिक्झर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स विभागाने टेक एक्स. मॅकेनिकल विभागाने मेक एक्स्पो, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाने अन्वेषण तर सिव्हिल विभागाने निर्मिती या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश हिमते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागासाठी नोवेल गोम्स, कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग- डाटा सायन्स या विभागासाठी उत्पल शाह, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागासाठी नितीन गोवरदीपे, सिव्हिल विभागासाठी निलभ गुप्ता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स या विभागासाठी विनीत खामराई तर मॅकेनिकल विभागासाठी अक्षय साळुंखे, अमृत अरोळे आणि अमित मालगोल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दरम्यान, महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक विशाल सावे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्विरीत्या पार पडला.