टीम इंडियाच्या उज्वल भविष्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी BCCI ने पुढचं पाऊल टाकलं आहे. बंगळुरूमध्ये National Cricket Academy चे उद्घाटन करत बीसीसीआयने खेळाडूंना एकप्रकारे गिफ्टच दिले आहे. त्याचबरोबर NCA च्या नावातही बदल करण्यात आला आहे.
BCCI ने बंगळुरुमध्ये नॅशनल क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले आहे. त्याचबरोबर NCA च्या नावात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे इथून पुढे NCA चे नाव BCCI Center Of Excellence (BCE) असे असणार आहे. नवीन बीसीइ अकादमी 40 एकरमध्ये पसरली असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. बीसीइमध्ये प्रामुख्याने 3 मैदाने आणि 86 खेळपट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे.
बीसीइचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणचे खेळाडूंच्या तंदुरुस्तीसाठी 16,000 स्क्वेअर फुटामध्ये जीम उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर खुल्या (open air theatre) 240 हून अधिक खोल्यांचा समावेश करण्यात आला आहे. सरावासाठी 45 मैदानी (Outdoor) खेळपट्ट्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर 8 Indoor खेळपट्ट्यांची (टर्फ) निर्मीती करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतरही अनेक आत्याधुनिक सुविधांचा समावेश बीसीइमध्ये करण्यात आला आहे.