Dapoli News – मुरुड समुद्र किनाऱ्यावर चेजिंग रुमच्या उभारणीसाठी प्रतिक्षा

दापोली तालुक्यातील मुरुड गाव हे पर्यटनाच्या दृष्टीने नावाजलेले गाव आहे. इथला स्वच्छ सुंदर समुद्र किनारा पर्यटकांना नेहमी आकर्षीत करतो. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पर्यटक मुरुडमध्ये हजेरी लावतात. त्याचबरोबर देशभरातून भटकंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुद्धा जास्त आहे. असे असताना समुद्र किनाऱ्यावर चेंजिग रुम नसल्यामुळे पर्यटकांची कुचंबना होत आहे. तसेच महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पावसामुळे अंशत: बंद असलेला पर्यटन व्यवसाय सप्टेंबर महिन्याच्या अखेरील जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे पुन्हा एकदा जोमाने सुरू झाला आहे. पर्यटक मोठ्या संख्येने समुद्र किनाऱ्यावर हजेरी लावत आहेत. स्वच्च सुंदर समुद्र किनारा पाहताच पर्यटक मनसोक्त पाण्यामध्ये डुबकी मारत आहेत. मात्र भिजलेले कपडे बदलण्यासाठी चेजिंग रुम नसल्यामुळे त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. समुद्र किनारी येणारे सर्वच पर्यटक हे निवासी ठिकाणी राहत नाहीत. बऱ्याच पर्यटकांची हॉटेल्स समुद्रि किनाऱ्यापासून लांब असतात.

मुरुड समुद्र किनाऱ्यावरली महिला आणि पुरषांच्या स्वतंत्र चेजिंग रुम जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची मोठी अडचण होत आहे. त्याचबरोबर पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले सुरक्षा वॉच टॉवरचेही नामोनिशान मिटले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र झोपलेल्या शासनाच्या संबंधित प्रशासन यंत्रनेला मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न स्थानिकानी उपस्थित केला आहे.