आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास होणार कारवाई, काश्मीर पोलिसांनी जारी केल्या सूचना

जम्मू काश्मीरमध्ये हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह याचा खात्मा केल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष होत आहे तर काही ठिकाणी विरोध प्रदर्शन केला जात आहे. रस्त्यावर उतरुन वादग्रस्त घोषणा दिल्या जातात. दरम्यान काश्मीरच्या सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर युजर्सना आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

पोलिसांनी आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हंटले आहे की, आम्ही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट पाहिल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी वादग्रस्त पोस्ट शेअर करणे आणि त्यात सहभागी होण्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

अशाप्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. काश्मीरची एकता आणि शांती राखण्यासाठी मिळून काम करायला हवे.

हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाहच्या हत्येनंतर श्रीनगर आणि बडगाम जिल्ह्यांच्या शिया बहुल परिसरात विरोध प्रदर्शन करण्यात आला आहे. मात्र त्यांचे हे विरोध प्रदर्शन पसरविण्यासाठी ते सोशल मीडियाची मदत घेत आहेत.