वडील CM, मुलगा DCM! तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, उदयनिधी स्टॅलिन यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

तामिळनाडू सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहे. क्रीडामंत्री आणि मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. रविवारी दुपारी राजभवन येथे त्यांचा शपथविधी पार पडला.

राज्यपाल आर.एन. रवी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. उदयनिधी यांच्यासह डॉ. गोवी चेझियान, आर राजेंद्रन आणि एसएम नासर यांचाही नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यासह मनी लॉण्डरिंग प्रकरणआमध्ये जामीन मंजूर झालेल्या व्ही. सेंथिल बालाजी यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाले आहे. अटक झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्यांनी राजीनामा दिला होता.

तमिळनाडूमध्ये वडील मुख्यमंत्री आणि मुलगा उपमुख्यमंत्री बनण्याची ही दुसरी वेळ आहे. याधी 2009 ते 2011 या काळात एम.के. स्टॅलिन हे उपमुख्यमंत्री होते. तर त्यांचे वडील एम. करुणानिधी हे मुख्यमंत्री होते. आता एम.के. स्टॅलिन हे मुख्यमंत्री, तर त्यांचा मुलगा उदयनिधी उपमुख्यमंत्री आहे.