मंकिपॉक्सने पाकिस्तानची वाढवली चिंता, कराचीत तीन नवीन प्रकरणे आली समोर

जगभरात मंकीपॉक्स हा चिंतेचा विषय बनला असून आता शेजारील देश पाकिस्तानात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. आज सौदीअरबहून पाकिस्तानच्या कराची विमानतळावर तीन प्रवाशांच्या मेडीकल स्क्रिनींग दरम्यान मंकीपॉक्सची लक्षणे आढळली , त्यानंतर सरकार अलर्टवर आहे.

एआरव्हाय न्यूजने सांगितले की, प्रवाशांच्या पुढील तपासासाठी एनआयपीए क्षेत्रात सिंध सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, विमानतळ प्रशासनाने खबरदारी म्हणून इमिग्रेशन क्षेत्र आणि मार्गांवर किटकनाशक स्प्रेची फवारणी केली.

याआधी 20 सप्टेंबर रोजी जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी एमपॉक्सचा एख संशयित रुग्ण आढळला होता. त्या प्रवाशाला पुढील तपासासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्ण सौदी अरबच्या जेद्दा येथून एबटाबाद येथीस 26 वर्षीय तरुण आहे. त्या तरुणाला विमानतळावर आल्यानंतर आरोग्य तपासणी केली असता संशयित एम-पॉक्ससाठी त्या व्यक्तिला तपासणी चिन्हांकित करण्यात आले.